Democracy Day on 02 May
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे मे 2023 मधील पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने माहे मे 2023 चा लोकशाही दिन मंगळवार 02 मे 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 01.00 ते 02.00 या वेळेत होणार आहे.लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.