लोटे रोट्रॅक्ट क्लब अध्यक्षपदी मनिष वाडकर यांची निवड

खेड (प्रतिनिधी) लोटे रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी मनिष वाडकर, सचिवपदी प्रणय काते व खजिनदारपदी अभिनीत कळंबटे यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सभागृहात पार पडला. मावळते अध्यक्ष अनिकेत काते यांनी अध्यक्षपदाची सूत्रे मनीष वाडकर यांच्या कडे सुपूर्द केली.
डिस्टिक्ट ३१७० चे डी. आर. आर. निखिल चिंडक यांनी नूतन अध्यक्ष वाडकर यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. याप्रसंगी एम ई एस कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य मिलिंद काळे, रोटरीचे अध्यक्ष शशांक रेडिज,
संतोष ठसाळे, पद्माकर सुतार, संकेत चाळके, विजय मोरे, इनरव्हील क्लबचे अध्यक्ष पाटील, सचिव प्रणाली रेडीज, सोनाली रहाटे, रोटरॅक्ट क्लब लोटेचे तुषार खताते, शुभम काते, आकाश काते, विराज खेडेकर, कुंदन मोरे, प्रशांत सावंत, मिथुन दिवेकर, गणेश जाधव, सुरज महाडिक, विक्रम पवार, प्रशांत सावंत उपस्थित होते. सूत्रसंचालन संकेत देवरुखकर यांनी केले.