खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील पंधरागाव विभागातील यथार्थ जगदीश उतेकर याने इंडिया ( युएसएआय) तर्फे आयोजित राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेतील १०० मीटर स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची थायलंड
येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा शहर संस्थेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त
आयोजित कार्यक्रमात त्याचा सन्मान करण्यात आला. चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी केल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.










