भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यांना मातृशोक

 

राजापूर (प्रतिनिधी)
शहरानजीकच्या शिळ नागरेकरवाडी येथील रहिवाशी श्रीमती पार्वती महादेव नागरेकर (८५) यांचे बुधवारी रात्री ८ वाजता निधन झाले. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व शिळ गावचे माजी सरपंच रविंद्र नागरेकर यांच्या त्या मातोश्री होत. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. मात्र, बुधवारी त्यांना सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

एक मनमिळाऊ व परोपकारी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती़ त्यांच्या पश्चात मुलगा रविंद्र, सून, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे, दिर, पुतण्या असा मोठा परिवार आहे. गुरूवारी सकाळी 9 वा. त्यांच्यावर शिळ येथील स्माशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.