फायनान्स कंपनीतील कर्मचार्‍याची प्रौढाला मारहाण

 

 

रत्नागिरी । प्रतिनिधी
शहरातील एका फायनान्स कंपनीत एनओसी साठी गेलेल्या प्रौढाला फायनान्स कंपनीतील कर्मचार्‍याने मारहाण केली. मारहाणीची ही घटना शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास घडली.

शहरातील राजिवडा येथील प्रौढ बँकेतून कर्ज काढण्यासाठी गेला होता. त्या बँकेने त्याला एका नामांकित फायनान्स कंपनीतून एनओसी पत्र आणावयास सांगितले. त्यानुसार, तो प्रौढ शुक्रवारी सायंकाळी त्या फायनान्स कंपनीत एनओसी पत्र आणण्यासाठी गेला असता तेथील दारुच्या नशेत असलेल्या कर्मचार्‍याने त्या प्रौढाला अज्ञात कारणातून मारहाण केली. त्यानंतर तो प्रौढ फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्या दारुच्या नशेत असलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍याने प्रौढाच्या पाठीमागून जात त्याला पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत कंपनीतील काही संगणकांचेही नुकसान झाले असून सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.