दिव्यांग विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण सवंगडी यांचा पेहराव करत साजरा केला गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव..

 

वेंगुर्ले | दाजी नाईक : साहस प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग संचलित “दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी” येथे आज दिव्यांग विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण,सवंगडी यांचा पेहराव करत आनंदात गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला.

 

कोणताही उत्सव म्हंटला की उत्साह येतोच. आज दिव्यांग विद्यार्थ्यांमध्येही उत्साह संचारला होता. राधाकृष्ण, सवंगडी यांचा पेहराव परिधान करीत त्यांनी कृष्णलीला सादर केली व दहीहंडी फोडली. विशेष शिक्षिका सौं.वेदिका राऊळ मैडम व सौ.द्रौपदी राऊळ मैडम यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या विश्वस्तानी व अध्यक्षा रुपाली पाटील यांनी ही सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. या सहभागी दिव्यांग विध्यार्थी यांच्या मध्ये राघव राऊळ, हर्षित राणे, गौरव सावंत, दूर्वा गावडे, राजेश्वरी सावंत, हर्ष गावडे, रुद्र बीडये, आदर्श जाधव यांचा समावेश होता. या सर्वांनी आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला.