माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील श्री विष्णू मंदिरातील गोकुळाष्टमी चा उत्सव पराग लघाटे लिखित ‘वास्तू तथास्तु’ या नाट्य प्रयोगाने झाली.
विष्णू मंदिरात दरवर्षी साजरा होणारा गोकुळाष्टमी उत्सव व स्थानिकांचे नाटक हे गेले कित्येक वर्षाचे समीकरण आहे.विशेष बाब म्हणजे अनेक ठिकाणच्या उत्सवात भाविकांची गर्दी कमी झालेली पाहायला मिळते.पण बुरंबाड येथील या कालाष्टमी च्या उत्सवाला आजही मुंबई पुणे व अन्य शहरातून भाविक व स्थानिक आवर्जून उपस्थित असतात.यावर्षी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे झाले.यानिमित्त माहेर वाशिणी व सासुरवाशीणी असा स्नेहमेळावा झाला.
गोकुळाष्टमी निमित्त प्रतिदिनी पवमानाभिषेक पूजा,आरती मंत्रपुष्प,कीर्तन आदी कार्यक्रम।झाले.यावर्षी किर्तन सेवेला पुण्याचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्रेयसबुवा बडवे उपस्थित होते.कालाष्टमी दिनी जाकडी, फुगड्या,उड्या, विविध कसरतीचे खेळ,मुंडे,कुस्त्या आदी खेळण्यात आले.दुपारी महाप्रसाद झाला.
रात्री विष्णू प्रासादिक मंडळातील हौशी कलावंतांनी ‘वास्तू तथास्तु’ ही एक नवीकोरी सामाजिक कौटुंबिक नाट्यकृती सादर केली.याचे दिग्दर्शन आनंद साठे यांनी केले होते.व विशेष भूमिका बजावली.यांसह या नाटकात भावना आंबेटकर,ओंकार वसंत नामजोशी,ओंकार उल्हास नामजोशी,सई जाधव,भरत आंबेटकर,प्रसाद कवळकर,भूषण कवळकर,नेहा केळकर,मंदार कवळकर आदींनी काम केले.
आरवली च्या श्री पराग लघाटे यांनी अतिशय सुंदर लिहिलेल्या नाटकाला श्री आनंद साठे यांनी उत्तम दिग्दर्शित केल्याने,प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
सर्वच कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने भाविकांचे आभार श्री विष्णू देव न्यासाचे अध्यक्ष श्री लक्ष्मण साठे यांनी मानले.











