भाडेतत्त्वावरील कार विकली प्रकरणातील संशयित आरोपीला जामीन

Bail to suspected accused in leased car sale case

मुंबई येथील एका इसमाची ईरटीका कार भाडेतत्त्वावर संशयित आरोपी श्री. गौरव गोविंद धुरी. रा. रानबांबुळीच्या ता. कुडाळ . जि. सिंधुदुर्ग व्यक्तीने व्यवसायासाठी घेतली होती. ती कार बनावट कागदपत्र करून कोल्हापूर येथील व्यक्तीला परस्पर विकल्या बद्दल संबंधित व्यक्तीने आरोपीच्या विरुद्ध कुडाळ पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली होती. शनिवारी २२ एप्रिल २०२३ रोजी सदर आरोपी स्वतः म्हणून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर त्याला भा.द.वि कलम 406, 420, 467, 468, 471 अन्वये गुन्ह्याखाली कुडाळ कोर्टासमोर हजर केले असता मे. न्यायाधीशांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. दोन दिवसाची पोलीस कोठडी ची मुदत संपल्यानंतर आज दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी कुडाळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला पुन्हा कुडाळ मे.कोर्टासमोर हजर केले असता पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु मे.न्यायाधीशानी आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने एडवोकेट हितेश हेमंत कुडाळकर यांनी काम पाहिले.