खेडमध्ये फुटल्या ४५०हून अधिक दहीहंड्या

 

खेड(प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी ४५० हून अधिक दहीहंड्या फुटल्या या मध्ये . १२ सार्वजनिक दही हंड्यांचा समावेश आहे. १५हून अधिक गोविंदा पथकांमार्फत ठिकठिकाणच्या दहीहंड्यांना सलामी देऊन हंडी फोडण्याचा प्रयत्न केला . शहरात मनसे, शिवसेना, उबाठा, भाजपकडून लाखोंच्या दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या .

शहरातील हनुमान पेठ, शिवतररोड, एसटी स्टॅण्ड,
शिवाजीचौक, महाडनाका, वाणीपेठ, निवाचा चौक, गांधीचौक, तीनबत्ती नाका, खांबतळे आदी परिसरातील दहीहंड्यांचा समावेश आहे. शिवसेना व मनसेच्या दहीहंडी उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते

हिंदूराज मित्रमंडळ गोविंदा पथक, हिंदूराज महिला मित्रमंडळ, श्रीकृष्ण गोविंदा पथक कुवारसाई, बाळ गोपाळ गोविंदा पथक-संत रोहिदासनगर, जय हनुमान मित्रमंडळ-रेवेचीवाडी, संत गोरा कुंभार मित्रमंडळ, श्री काळकाई गोविंदा पथक भरणे, हनुमान मित्रमंडळ खेड, एकविरा कुभारवाडा गोविंदा पथक, श्री महालक्ष्मी गोविंदा पथक चाकाळे, श्री खोंडेकरीन देवी खोंडे, क्षेत्रपाल नगर गोविंदा पथक, खेमनाथ गोविंदा पथक सुसेरी-खारी, भैरवनाथ गोविंदा पथक चिंचघर, श्रीकृष्ण गोविंदा पथक भडगाव आदी गोविंदा पथके शहर व भरणे परिसरातील हंड्या फोडण्यासाठी चुरस दिसून आली दही हंड्या चा थरार सांयकाळी उशिरा पर्यत सुरू होता