जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी मुकादमची निवड

 

खेड(प्रतिनिधी) श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील (सीबीएसई) एका खेळाडूची विभागीय मल्लखांब तर दुसऱ्या खेळाडूची जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तर मल्लखांब स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १२वीतील यश शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला. तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इ. १२वीतील अब्दुल्ला मुकादम याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याची
जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दोन्ही खेळाडूंचा संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्षा सुप्रिया
पाष्टे, दिग्विजय इंदुलकर, उदय शेटवे, प्राचार्य डॉ. एस. एस. अली, क्रीडाशिक्षक दादासाहेब ब्राह्मणे, रसिका पालांडे, सिद्धी पांचाळ आदी उपस्थित होते.