सांस्कृतीक केंद्राजवळ आयोजित भारतीय जनता पार्टी च्या लाखमोलाच्या दहीहंडीला चिपळूण – संगमेश्वर विधानसभेचे विद्यमान आमदार मा. श्री शेखरजी निकम सर,तसेच भारतीय जनता पार्टी गुहागर विधानसभेचे माजी आमदार श्री विनयजी नातू साहेब, शिवसेनेचे माजी आमदार मा. सदानंदजी चव्हाण,माजी नगराध्यक्षा सुरेखा ताई खेराडे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा ताई चव्हाण मुख्याधिकारी श्री विशालजी भोसले, नगरपरिषदेचे श्री मंगेशजी पेढामकर , वैभव निवाते, बापू साडवीलकर,मनसे शहराध्यक्ष अभिनव भुरण, श्री. कोकरे महाराज, राष्ट्रवादीचे श्री मिलिंदशेठ कापडी,सौ अदिती देशपांडे, याची विशेष उपस्थिती या सोहळ्यासाठी होती.
दहीहंडी कार्यक्रमाला दादा साळवी मित्रमंडळ, जय हनुमान खेर्डी, जय गणेश, आई महाकाली पोफळी, आई महाकाली शिरगांव, आई काळेश्वरी, स्वराज्य महिला, ॐ साई, छत्रपती शिवाजी महाराज, भैरी भवानी, शिव शंभो, आई सुकाई कोंडफणसवणे, वक्रतुंड गणेश गोवळकोट इत्यादी गोविंदा पथकांनी सलामी दिली तसेच भारतीय जनता पार्टी ची मानाची दहीहंडी गोवळकोट च्या वक्रतुंड गणेश पथकांनी फोडली. सर्वं गोविंदा पथकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
तसेच सामाजिक व क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातउल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेकांचे सत्कार यावेळी करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई चव्हाण, माजी नगराध्यक्षा सुरेखा ताई खेराडे, माजी नगरसेविका नुपूर बाचीम, रसिकाताई देवळेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, आशिष खातू, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे सरचिटणीस सचिन ओक, चिपळूण दक्षिण तालुकाध्यक्ष अजित थरवलं चिपळूण शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष वसंत ताम्हणकर, जिल्हाउपाध्यक्ष रामदासजी राणे, रत्नदीप देवळेकर, माजी शहराध्यक्ष वैशाली निमकर, महेश दीक्षित अविनाश सावर्डेकर, संदेश भालेकर, प्रभंजन पिंपुटकर, मंदार कदम, श्रद्धा कदम, अश्विनी वरवडेकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा शीतल रानडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप भिसे,अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष,अमित चिपळूणकर, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रणय वाडकर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष फैजू दळवी तसेच जतीन घटे, राकेश घोरपडे, भरत परब, सारिका भावे, विनायक वरवडेकर, निनाद आवटी, प्रणाली सावर्डेकर,रोहित हटकर अमृता जोशी, महेश विंचू, निखिल किल्लेकर सुनील जांभेकर, अभिजित सावर्डेकर, महिला मोर्चा चिटणीस जया केतकर, साधना कात्रे,पूनम काजारी, सोनल कारेकर, रोहन जडे, प्रज्योत सावर्डेकर, सर्व जिल्हा, तालुका, शहर चे सर्व मोर्चा, सेल प्रकोष्ट चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे व युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप भिसे,यांच्या नेतृत्वाखाली संयोजक राकेश घोरपडे संदेश भालेकर यांच्या मार्गदर्शनात सर्वं पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मेहनती कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.











