खेड (प्रतिनिधी) खेड तालुका रहिवाशी मंच मुंबईच्या वतीने ६ जुलै रोजी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
तालुक्यातील जि.प.शाळा सुसेरी नं. १ व २, खारी, नांदगाव, कोरेगाव, मुंबके, कर्जी, राजवेल आदी शाळांतील ३५० गरजू विद्याथ्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वितरीत करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मुंबकेतील सामाजिक सुरेश सालेकर, बाळाशेठ बहुतुले, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापक समितीचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.
याप्रसंगी मंचचे अध्यक्ष मंगेश तरडे, उपाध्यक्ष विजय जाधव, सचिव मंगेश चव्हाण, खजिनदार सुशांत कदम, माजी अध्यक्ष नवनाथ निंबाळकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व सदस्य सुरेश जाधव, जेष्ठ मार्गदर्शक मनोहर पवार आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंचचे अध्यक्ष मंगेश तरडे यांनी केले आहे.









