खेड मध्ये थंडी तापाने विवाहितेचा मृत्यू 

खेड(प्रतिनिधी) मोठ्या प्रमाणात ताप व थंडी वाजु लागल्याने येथील कळंब णी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू  झाल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली
सौ. समिक्षा सुरेश सावंत वय. ३५ वर्षे, रा खोंडे कातळवाडी ता. खेड जि. रत्नागिरी असे त्या मृत्यू मुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे

मयत हीला जास्त प्रमाणात ताप व थंडी वाजु लागल्याने तिला २८ रोजी दुपारी ०२.३० वाजताचे दरम्याने रिक्षाने उप रुग्णालय कळंबणी ता. खेड येथे उपचाराकामी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला तपासुन ती मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणुन नोंद केली आहे