श्री सार्थ रामरक्षा स्तोत्राचे उद्या प्रकाशन

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे येथील जेष्ठ कवी रवळनाथ देवस्थानचे सेवेकरी कृष्णा देवळी यांनी संस्कृत भाषेतील सार्थ रामरक्षा हे प्राचीन काळी श्री बुधकौशक नामक ऋषीनी लिहिलेले श्री प्रभू रामचंद्राच्या महतीवर अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावी स्तोत्र सर्व सामान्या पर्यंत पोचावे यासाठी संस्कृत भाषेत असणाऱ्या या स्तोत्राचा मराठीत अनुवाद ओवीबद्ध केला आहे.

 

 

या अनुवादित स्तोत्राचे प्रकाशन शनिवारी सायंकाळी 5वाजता श्री रवळनाथ मंदिर येथे होणार आहे. ही स्तोत्र पुस्तीका घरोघरी पोचावी आणि त्याचे पठन व्हावे आणि या उद्देशाने पुस्तिका विनामूल्य दिली जाणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कवी कृष्णा देवळी यांनी केले आहे.