शशिकांत घाणेकर बुरंबाड चे तिसऱ्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्ष

माखजन |वार्ताहर :       संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शशिकांत विश्राम घाणेकर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा एकमताने निर्णय घेण्यात आला.गेली दोन वर्षे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पद सांभाळत शशिकांत घाणेकर यांनी गाव तंटामुक्त केला होता.त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामसभेत उपस्थितांनी अध्यक्षपदाची माळ शशिकांत घाणेकर यांच्या गळ्यात घातली.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.