कुडाळ येथे होणार सर्वात मोठी दहीहंडी

 

भाजप व शिंदे गट शिवसेना संयुक्त विद्यमाने होणार दहीहंडी

कुडाळ | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी व शिंदे गट शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील नवीन एस. टी. बस आगार येथील मैदानावर कोकणातील सर्वात मोठी दहीहंडी उद्या शनिवार ३१ ऑगस्ट रोजी संध्या. ४ वाजता पासून सुरू होणार असल्याची माहिती ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी देऊन या दहीहंडीसाठी हिंदी व मराठी अभिनेते उपस्थित राहणार आहेत असे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.

 

 

माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून कोकणातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले आहे. या दहीहंडीसाठी रोख रुपये ५ लाख ५५ हजार ५५५ एवढे असून तीन थरापासून रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत असे मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले.

 

 

या दहीहंडीसाठी मिस युनिव्हर्सल इंडिया उर्वशी रोतेला, सिने अभिनेता अंकुश चौधरी, सिने अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता समीर चौगुले, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, मराठी कॉमेडी अभिनेता गौरव मोरे हे या दहीहंडीसाठी उपस्थित राहणार आहेत. या दहीहंडीसाठी २८ संघ सहभागी झाले आहे. या दहीहंडीसाठी प्रमुख उपस्थिती कुडाळ मालवणी विधानसभा प्रभारी निलेश राणे यांची असणार आहे असेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगून ही दहीहंडी साध्या स्वरूपात आणि देशभक्तीपर गीताने साजरी होणार आहे.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा चिटणीस विनायक राणे, महिला अध्यक्ष आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, माजी सभापती अभय परब, श्रीपाद तवटे, विजय कांबळी, बाळा पावसकर उपस्थित होते.