खेड तालुका राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची कार्यकारिणी जाहीर

 

 

खेड (प्रतिनिधी) भरणे येथील हॉटेल बिसु सभागृहात तालुकाध्यक्ष विनायक निकम यांनी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष – विनायक निकम, ज्येष्ठ नेते – वसंत गुरव, अविनाश आंब्रे, अन्वर खान, गजानन सकपाळ, रविंद्र बापूजी भोसले, असिफभाई हमदुले, बाबाराम तळेकर, शाहू रामचंद्र शेलार, मोहिद्दीन कुडुपकर, व राजाभाऊ बैकर, युवक तालुकाध्यक्ष सुरज बळीराम जोगळे, महिला तालुकाध्यक्षा तेजा राजाराम बैकर, शहराध्यक्ष प्रणव म्हापूसकर, महिला खेड शहराध्यक्षा सौ. अश्विनी दरेकर, जिल्हा महिला सरचिटणीस गीता मोहन घाणेकर, सदस्य जावेद बशीर परकार, एकनाथ गायकवाड, विश्वास सुर्वे, बापू चव्हाण, कैलास यादव, दिलीप पांडुरंग काणेकर, चंद्रशेखर हेळगावकर, तुकाराम साबळे, लक्ष्मण घोलप व सुभाष पालकर अशी २६ जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित कार्यकारिणीचे खेड तालुका राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या .