दापोली Breaking : उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ‘लाच लुचपत’ च्या जाळ्यात

Dapoli Breaking: Medical officer of sub district hospital in the net of ‘bribery’

शस्त्र परवाना नुतानिकरणासाठी लागणाऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी 18 हजार रुपये स्वीकारताना पकडले 

दापोली | प्रतिनिधी : उप जिल्हा रुग्णालय, दापोली, ता. दापोली, येथील वैद्यकीय अधिकारी, वर्ग – २ डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे यांना 18 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने आज रंगेहाथ पकडले.

लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना 29 वर्षें तरुणाने तक्रार केली होती त्याप्रमाणे यातील तक्रारदार यांचे वडिलांचा शस्त्र परवाना नुतानिकरण करणेचा होता, त्याकामी तक्रारदार यांचे वडीलांची वैद्यकीय तपासणी होऊन त्या बाबत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. त्या बदल्यात डॉ.कुराडे यांनी सदर वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी 20,000/- रु लाच रकमेची मागणी  केली होती. तडजोडी अंती 18,000/- रु लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष स्वीकारताना आरोपी लोकसेवक यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे…

▶️ सापळा पथक – प्रवीण ताटे, पोलीस निरीक्षक, पोहवा/ विशाल नलावडे, पोना/ दीपक आंबेकर व चापोना/प्रशांत कांबळे

▶️ पर्यवेक्षण अधिकारी –
श्री. सुशांत चव्हाण,
पोलीस उप अधीक्षक,
ला.प्र.वि., रत्नागिरी

▶️ मार्गदर्शन अधिकारी –
मा. श्री. सुनिल लोखंडे,
पोलिस अधीक्षक,
ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे

मा. श्री. अनिल घेरडीकर,
अप्पर पोलीस अधीक्षक,
ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे

▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – मा. जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी
—————————–
रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.

संपर्क –
1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय-
फो.नं. – 02352-222893

2. श्री सुशांत चव्हाण, पो.उप.अधी. , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी
मो.नं. – 9823233044

3. श्री प्रविण ताटे, पो.नि., लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी
मो.नं. – 8055034343

4. श्री अनंत कांबळे, पो.नि., लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी
मो.न. – 7507417072

5. टोल फ्री – १०६४

चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू ( सदरचा मेसेज आपल्या सर्व ग्रुप्स मध्ये प्रसारित करावा ही विनंती )