ज्ञानदीप भडगाव च्या तनुश्री नारकरची विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

खेड(प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, यांचेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा डेरवण क्रीडा संकुल येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इ. 11th कॉमर्स मधील विद्यार्थिनी तनुश्री गणेश नारकर हिने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिची पुढे होणाऱ्या कोल्हापूर विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच इ. ९ वी तील पलक वैभव कोकाटे व 12 th विज्ञान मधील आर्यन आंब्रे यांनी सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे पालकांचे व मार्गदर्शक शिक्षक शशांक घडशी, संतोष भोसले, मारुती आडाव यांचे संस्था व प्रशालेतर्फे अभिनंदन करण्यात आले