लांजा तहसीलदारपदी प्रियांका ढोले रुजू

 

लांजा (प्रतिनिधी) लांजा तहसीलदार म्हणून प्रियांका ढोले या रुजू झाल्या असून त्यांनी शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे .
लांजा तहसीलदार म्हणून यापूर्वी काम पाहणारे प्रमोद कदम यांची पालघर जिल्हा येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदी प्रियांका ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियांका ढोले या यापूर्वी मुंबई येथे कार्यरत होत्या.
त्यांनी शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.