महायुतीकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह तब्बल १९ नवीन चेहऱ्यांना संधी
माजी नगरसेवक संजय ओगले, सौरभ खडपे निवडणूक रिंगणात
राजापूर | प्रतिनिधी : शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी शरद पवार गट व अन्य या महायुतीच्या वतीने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत भव्य मिरवणूकीने लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह २० नगरसेवक पदाचे अमेदवार असे २१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
महायुतीकडून रविवारी जाहिर केल्याप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी श्रृती ताम्हनकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीत शिवसेनेकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह १८ जागी, भाजपाकडून दोन तर राष्ट्रवादी अजितपवार गटाकडून एकग अशा एकूण २१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांच्याकडे सादर केले.
महायुतीकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह तब्बल १९ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहेत. माजी नगरसेवक संजय ओगले व सौरभ खडपे हे पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
महायुतीकडून रविवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत व भाजपाचे निरीक्षक दीपक पटवर्धन व राष्ट्रवादीचे बंटी वणजू यांनी महायुतीची घोषणा करत उमेदवारांची यादी जाहिर केली होती. त्याप्रमाणे सोमवारी महायुतीच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीत शिवसेना नगराध्यक्षपदासह १८ जागांवर, भाजपा दोन तर राष्ट्रवादी एका जागेवर ही निवडणूक लढवणार आहे.
महायुतीकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी श्रृती ताम्हनकर यांनी तर नगरसेवक पदासाठी प्रभाग १ अ मधून सौ. सान्वी सचिन रावण, प्रभाग १ ब मधून सौरभ संजय खडपे, प्रभाग २ अ मधून दिलीप दिवाकर चव्हाण, ब मधून सुयोगा सुनिल जठार, प्रभाग ३ अ मधून सौ. आरती गणेश जाधव तर प्रभाग ३ ब मधून दिपक विनायक गुरव, प्रभाग अ मधून उमिला बाकाळकर, ४ ब मधून दिलीप अमरे यांना तर प्रभाग ५ अ मधून किशोर काशिनाथ जाधव, प्रभाग ५ ब मधून सुमैय्या जिलानी काझी, प्रभाग ६ अ मधून निलोफर मुद्दसर मुकादम, ब मधून खलील अहमदहसन सय्यद, तर प्रभाग ७ अ मधून रसिका कुशे, ब मधून असिम साजिद काजी, प्रभाग ८ अ मधून प्रेरणा नार्वेकर, ब मधून एड. राहुल रमाकांत तांबे, प्रभाग ९ अ मधून सौ. नेत्रा निलेश सोगम, प्रभाग ९ ब मधून संजय पांडुरंग ओगले, तर प्रभाग १० अ मधून सौरभ पेणकर, प्रभाग १० ब मधून साजिया हनिफ काझी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय ते जवाहर चौक अशी भव्य मिरवणूक काढत व जोरदार शक्तीप्रदर्शन करत महायुतीच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जवाहर चौकात आ. सामंत यांसह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक विलास चाळके, भाजपाच्या प्रदेश महिला सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, रवींद्र नागरेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अशफाक हाजू, संपर्क प्रमुख प्रकाश कुवळेकर, शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, एड. शशिकांत सुतार, एड. यशवंत कावतकर, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी हे जरी निवडणूक रिंगणाबाहेर असले तरी यांची कन्या साजिया काझी यानी प्रभाग क्र. १० ब मधून तर त्यांची भावजय सुमैय्या जिलानी काझी यानी प्रभाग ५ ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.












