पारंपारिक टिपरीनृत्य स्पर्धेत नवलादेवी नाच मंडळ शीळ प्रथम
राजापूर (वार्ताहर): शिवसेना महिला संघटना आयोजित केळवली जिल्हा परिषद गट, कोदवली जिल्हा परिषद गट आणि राजापूर शहर श्रावण महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी झालेल्या महिलांच्या पारंपारिक टीपरीनृत्य स्पर्धेत शीळ येथील नवलादेवी नाच मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
पालकमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील केळवली जिल्हा परिषद गट, कोदवली जिल्हा परिषद गट आणि राजापूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे श्रावण महोत्सव आणि श्रीकृष्ण लीला पेहराव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिवसेना महिला संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आणि किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून श्रावण महोत्सव मंगळागौर स्पर्धा, टीपरी नृत्य आणि कृष्ण लिला पेहराव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत कणेरीवाडी नाच मंडळ उन्हाळे यांनी द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक दुर्गादेवी नाच मंडळ हर्डी ने तृतीय क्रमांक पटकावला.
या महोत्सवात शेंगाळे वाडी महिला मंडळ विल्ये, शेजवली महिला मंडळ, शिवाजी नगर, भरड वाडी शीळ, डोंगर दत्तवाडी महिला मंडळ, उन्हाळे कणेरी वाडी महिला मंडळ, उन्हाळेपुजारे वाडी महिला मंडळ, जिजामाता समूह सोल्ये, प्रिंदावन मानवाडी, गोरूले वाडी, दुर्गादेवी महिला हर्डी, नवलादेवी नाच मंडळ शीळ, भाग्यलक्ष्मी महिला मंडळ मोंडे वाडी उन्हाळे, आराध्य ग्रामसंघ पन्हळे, निनादेवी नाच मंडळ वरची वाडी कणेरी हे संघ सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ. शुभांगी आदिनाथ डबरे यांनी केले. यावेळी महिला वर्गाला मार्गदर्शन महिला जिल्हा प्रमुख शिल्पाताई सुर्वे यांनी केले.
श्वेता जोगळेकर आणि श्रेया सावंत यांनी परीक्षक म्हणून आणि सुनील बेंडसळे यांनी सूत्र संचालन केले.
तसेच या कार्यक्रमावेळी कृष्ण लिला पेहराव स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये छोटा गट तीन ते सहा वर्षे आणि मोठा गट सात ते दहा वर्षे अशी दोन गटांत स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही गटातील अनुक्रमे तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. तसेच मुलांना भेट वस्तू देण्यात आली.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा महिला प्रमुख सौ.शिल्पाताई सुर्वे, उपजिल्हा प्रमुख विनया गावडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख मानसी आंबेकर, राजापूर महिला तालुका प्रमुख सौ. शुभांगी डबरे, लांजा महिला तालुका प्रमुख रसिका मेस्त्री, आदींसह महिला पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











