नेरकेवाडी केंद्रशाळेचे शिक्षक अनिल मोहिते यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

नेरकेवाडी उत्कर्ष मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील गोठणे दोनिवडे नेरकेवाडी केंद्रशाळा क्रमांक तीन चे शिक्षक अनिल मोहिते हे आपल्या नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा नेरकेवाडी उत्कर्ष मंडळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना सेवानिवृत आयुष्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

गोठणे दोनिवडे नेरकेवाडी शाळा केंद्र शाळा क्रमांक तीन चे शिक्षक अनिल मोहिते हे आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत होत आहेत. याबद्दल शुक्रवारी केंद्र शाळा नेरकेवाडी येथे त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर अनिल मोहिते, सौ. सुरेखा अनिल मोहिते यांसह वाडीचे गावकर गणपत राघव, महादेव शिवगण, सखाराम शिवगण, पोलीस पाटील सचिन मांडवकर, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गोरे, श्रीकांत मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नेरकेवाडी उत्कर्ष मंडळाच्या वतीने मंडळाच्या स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका यांनी अनिल मोहिते यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छा व भेटवस्तु देऊन सत्कार केला. तर नेरकेवाडीतील ग्रामस्थांनीही मोहिते यांचा यावेळी सत्कार केला.

 

 

याप्रसंगी मनोहर वादक, विलास गोरे, प्रकाश झोरे, नरेंद्र मोहिते, संदीप देशपांडे आदींनी मनोगत व्यक्त करून मोहिते यांना शुभेच्छा दिल्या. तर त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ज्येष्ठ बंधू धनाजी मोहिते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना अनिल मोहिते यांनी आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केल्याचे नमुद करत स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य व मार्गदर्शन यामुळेच चांगले काम करू शकल्याची भावना व्यक्त केली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रज्ञा कुडकर, उपाध्यक्ष संतोष कुडकर, गावकर शांताराम राघव, सुरेश शिवगण, मनोहर शिवगण, प्रदीप मोहिते, हरेश कातकर, श्री. शिरसेकर, श्री. कुडकर, शाळेतील शिक्षक वृंद, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.