विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकारणाचा भाजपच्या माध्यमातून निषेध
सावंतवाडी । प्रतिनिधी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटने प्रकरणी माफी मागितली असताना देखील विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकारणाचा भाजपच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो झळकावत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे नेते आरडाओरड वरून शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेवर राजकारण करत आहेत असा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
येथील भाजप तालुका कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या विरोधात रस्त्यावर उतरत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हा निषेध व्यक्त केला यावेळी महाविकास आघाडीचे मुख्य नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साऱ्यांसाठी वंदनीय आहेत. मालवण राजकोट दुर्घटनेवरुन देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली आहे, देशातील तमाम शिवभक्तांनीही माफी मागितली. तरी देखील महाविकास आघाडीचे नेते राजकारण करत असून निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात अराजक पसरविण्याचे काम करत आहेत. म्हणून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज महायुती रस्त्यावर उतरली आहे.
यावेळी भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महेश धुरी,मनोज नाईक, रवी मडगावकर,उदय नाईक,अजय सावंत, सचिन बिर्जे, प्रमोद गावडे, बंटी जामदार,ज्ञानेश्वर पाटकर, बंड्या कोरगावकर, क्लॅटस फर्नांडिस, सविता टोपले, सचिन साटेलकर, परीक्षित मांजरेकर, मधुकर देसाई, दीनानाथ नाईक, मेघ











