मनोज जरांगे पाटील यांची कुडाळ मधील सभा ऐनवेळी रद्द

मालवण वरून परस्पर पुढील दौऱ्यासाठी रवाना

कुडाळमध्ये होता कडेकोट पोलीस बंदोबस्त

 

कुडाळ (प्रतिनिधी)*

मनोज जरांगे पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच येत असल्याने जिल्ह्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा एक भव्य मेळावा कुडाळ येथे आयोजित करण्यात आला होता मात्र अचानक ऐनवेळी त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला मात्र कार्यकर्त्यांची कमी संख्या लक्षात घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची चर्चा चर्चेली जाऊ लागली .जरांगे पाटील हे मालवण येथून राजकोट येथील पाहणीनंतर कुडाळ कडे यायला निघाले असा संदेश देण्यात आला त्यामुळे लोक त्यांची मराठा सभागृहाकडे वाट पाहत होते माजी मंत्री प्रवीण भोसले जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सतीश सावंत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आधी मराठा समाजाचे दिग्गज नेते तसेच काही कार्यकर्ते सभास्थळी आले होते मात्र एक तास उलटून गेला तरी ते येत नाहीत हे लक्षात आल्यावर पुन्हा फोनाफोनी सुरू झाली आणि अचानकपणे जरांगे पाटील आता थेट कसाल मार्गे कोल्हापूर मार्गे आपल्या नियोजित दौऱ्यावर रवाना झाले आणि आजचा मेळावा रद्द करण्यात आला, त्यामुळे सभासतांनी आलेल्या मोजक्याच मंडळींना आल्या पावली माघारी परतावे लागले

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज रविवारी सकाळी मालवण राजकोट येथे जाऊन कडेकोट पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. त्यांनतर ते कुडाळमध्ये मराठा समाज मेळाव्याला उपस्थित राहणार असा त्याचा दौरा कार्यक्रम होता. कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये हा मेळावा होणार होता. पण पुढे नियोजित कार्यक्रम असल्याने जरांगे पाटील मालवणहून कसालमार्गे पुढील नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले. त्यामुळे त्यांचे विचार ऐकण्यासाठी जमलेल्या मोजक्याच नागरिकांचा मात्र हिरमोड झाला.कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये हा मेळावा होणार होता. सध्या राज्यातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून जरांगे पाटील यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे त्यांच्या या मेळाव्याला गर्दी होणार,असा अंदाज असल्याने आणि मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच सिंधुदुर्गात येत असल्याने, तो सगळा अंदाज बांधून पोलीस प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील मागविण्यात आली होती. मराठा हॉलच्या आजूबाजूला पोलिसच पोलीस उभे असलेले दिसत होते. त्याच बरोबर ज्या नेरूरपार मालवण मार्गाने जरांगे पाटील कुडाळ मध्ये दाखल होणार होते त्या मार्गात देखील पोलीस तैनात होते. कुडाळच्या पोताजवळच्या नाक्यावर देखील पोलीस बंदोबस्त होता.मराठा समाजाच्या हॉल बाहेर मराठा समाजाचा भगवा फडकत होता. १० वाजून गेले. ११ वाजले तरी मनोज जरांगे पाटील आले नव्हते. कोणतीतरी सांगितले कि आता ते पाहणी करून मालवण वरून निघाले आहेत. त्यामुळे पत्रकार सुद्धा मराठा हॉल मध्ये पोहोचले होते. हॉल मध्ये तशी माणसांची गर्दी नव्हती. पण नंतर माणसे येतील असे आयोजकांना वाटले होते. पण आयोजकांनी थोड्यावेळाने जाहीर केले कि मनोज जरांगे पाटील यांची मालवण मध्ये पत्रकार परिषद झाली आहे. आणि त्यांना लवकर पुढील मुक्कामी पोहोचायचे असल्याने ते मालवणवरून परस्पर कसालमार्गे पुढे रवाना झाले आहेत. हि घोषणा ऐकल्यावर सर्वजण हॉल बाहेर पडले. जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या मोजक्याच नागरिकांचा मात्र हिरमोड झाला. याबाबत नंतर उलटसुलट प्रतिक्रिया मात्र उमटत राहिल्या.