कांदळगाव येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह महान जंगलात सापडला

 

मालवण | प्रतिनिधी : महान जंगलमय भागात गुरुवारी सकाळी एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पहाणीअंती हा मृतदेह समीर श्यामसुंदर सावंत (वय ३३) रा. राणेवाडी कांदळगाव यांचा असल्याची माहिती समोर आली.दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून तसेच आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून शवविच्छेदन केले. सायंकाळी कांदळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.समीर याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे बोलले जात होते. त्यात गेले काही दिवस तो बेपत्ता होता. गुरुवारी महान येथील जंगलमय भागात त्याचा मृतदेह सापडून आला. समीर याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व अन्य परिवार आहे.