*माखजन |वार्ताहर :संगमेश्वर तालुक्यातील धामापूर पंचायत समिती गणात ऋण फाऊंडेशन तर्फे शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.विविध शाळांमध्ये वाटप पूर्ण झाल्यावर
वाटपाचा सांगता कार्यक्रम धामापूर प्राथमिक शाळा क्रमांक ३ मध्ये संगमेश्वर तालुक्याच्या तहसिलदार सौ.अमृता साबळे ,आमदार शेखर निकम यांच्या कन्या सई निकम सुर्वे, ऋण फाऊंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती.अंकिता चव्हाण यांचा प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सचिव श्री.विलास चव्हाण यांनी ऋण फाऊंडेशन विषयी माहिती देऊन फाऊंडेशन ची पुढील ध्येय धोरणे सांगितली. तहसिलदार अमृता साबळे व सई निकम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्याध्यक्ष श्री.अक्षय चव्हाण व शेखर उकार्डे,सुशील भायजे यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाला धामापूर चे सरपंच श्री.शांताराम भायजे, आंबव पोंक्षे गावचे सरपंच श्री.शेखर उकार्डे,तुकाराम मेस्त्री,गणपत चव्हाण,सुधीर चव्हाण,मनोहर चव्हाण,विनायक चव्हाण,दत्ताराम म्हापरले,प्रवीण लांबे,महेश घाणेकर, प्रथमेश चव्हाण, धुलप गुरुजी,शाळेच्या मुख्यद्यापिका,शालेय कमिटी अध्यक्ष,सर्व शिक्षक,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.












