गुहागर | प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मनसे पालपेणे शाखेच्या माध्यमातून गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांच्या विशेष सहकार्यातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा येथे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जाणवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालपेणे शाळा नं १,२,३ मधील विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप
कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, विभाग अध्यक्ष तुषार शिरकर,विवेक शिर्के
तसेच निर्मल ग्रामपंचायत पालपेणेचे उपसरपंच दिलीप पाष्टे यांच्यासह
शाळा नंबर १ च्या मुख्या. पूर्वा परचुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश टाणकर, उत्कर्ष पालकर,नार्वेकर, पवार ,बेलेकर,
शाळा नं २ चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश घाणेकर, उपाध्यक्ष सुहाना आदवडे, पोलीस पाटील वृषाली नवरत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विनायक घाणेकर, परेश कदम, मुख्याध्यापक समगिस्कर , शाळा नं.३ च्या मुख्याध्यापिका प्रज्ञा पवार , व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राची मांडवकर, वृणाली रहाटे, सुप्रिया जानवळकर, सुहाना आदवडे, अश्विनी रहाटे, नारायण आदवडे, रघुनाथ रहाटे व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा गुहागरच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळा पालपेणे नं.१,२,३ च्या वतीने स्वागत व आभार मानण्यात आले.












