बांदा : प्रवीण परब : गणेशचतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र – गोवा सीमेवर बांदा – सटमटवाडी येथे अवजड वाहतुकीची वाहने रोखण्यात आली आहेत. सटमटवाडी सीमा तपासणी नाक्यावर शेकडो ट्रक व कंटेनर अडकून पडले आहेत. मध्यरात्री पासून पोलीस प्रशासनाने ही कारवाई सुरू केली. रविवार ८ सप्टेंबर रोजी रात्री ही वाहने सोडण्यात येणार आहेत. गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाढत्या वाहनांमुळे ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.












