चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील बाजारपेठ ही कोकणातील एकमेव प्रसिद्ध असलेली बाजारपेठ मानली जाते. या बाजारपेठेत कोणताही प्रसंग व दबाव आला तर त्यासाठी व्यापारी सर्व एकत्र येतात व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसापासून व्यापारी चिंतेत आहेत. या व्यापाऱ्यांमध्ये काही पुढारी असून ते राजकीय वळण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत काही व्यापाऱ्यांनी श्री.सरगुरोह यांना फोनद्वारे व प्रत्यक्ष भेट देऊन समस्या मांडली आहे. व्यापाऱ्यांनी विस्ताराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांना लागणारे सहकार्य करू, असे आवाहन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी केले आहे.
कोरोना काळानंतर मार्केटची परिस्थिती हळूहळू सुधारत असताना व्यापाऱ्यांवर प्रशासक तसेच राजकीय दबाव येत असल्याचे बोलले जात आहे. व्यापारी आपले अस्तित्व टिकाव्य म्हणून सेल किंवा अन्य माध्यमातून विक्री करत आहेत. आता डिजिटल युग आहे. या युगात ग्राहक ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देत असून घरी बसून वस्तू विकत घेत आहेत . यामुळे मार्केट खालावली आहे. व्यापाराची परिस्थिती कशी सुधारावी याकडे दुर्लक्ष केले जात आहेत. संघटना कितीही स्थापन झाली तरी चालेल मात्र ती व्यापाऱ्याच्या हिताची असावी यामध्ये कोणताही स्वार्थ नसावा असेही श्री. सरगुरोह म्हणाले. त्यात कोणी राजकारण करत असेल तर त्याची गाठ आमच्याशी आहे. आम्ही त्यांच्या विरोधात उभे राहू, असे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी सांगितले.












