रत्नागिरी : प्रतिनिधी :तालुक्यातील कोतवडे येथील नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. सुमारास उघडकीस आली.
विश्राम कृष्णा परवडे (67,रा.कोतवडे, रत्नागिरी ) असे बुडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. बुधवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. ते मोलमजुरी करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. ते उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांचा पुतण्या त्यांचा शोध घेत असताना गुरुवारी सकाळी कोतवडे लागवणवाडी येथून जाणाऱ्या कुसुम नदीच्या पाण्यात विश्राम परवडे उपडया स्थितीत पडलेले दिसून आले. वाडीतील लोकांनी त्यांना बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.












