एकता चषक क्रिकेट स्पर्धेत नाधवडे गावठण संघ प्रथम तर सरदारवाडी संघ द्वितीय

In the Ekta Cup cricket tournament, Nadhwade Gavthan team was first and Sardarwadi team was second

नाधवडे प्रीमियर लीग एकता क्रिकेट स्पर्धा मुंबई येथे संपन्न

वैभववाडी | प्रतिनिधी : मुंबई येथे आयोजित नाधवडे प्रिमियर लीग एकता चषक क्रिकेट स्पर्धेत नाधवडे गावठण संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक नाधवडे सरदारवाडी संघाने मिळविला. सलग पाच वर्ष या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत बारा वाडीतिल बारा संघ सहभागी झाले होते. माजी क्रिक्रेट कसोटीपटू श्री. अजित पै यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रिक्रेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, स्थानिक नगरसेवक श्री.समिर देसाई, प्रबोधन क्रिडा सकुल गोरेगांव चे व्यवस्थापक श्री.रमेश इस्वलकर, उद्योजक श्री.हनुमंत नारकर, हिरानंदानी ग्रुप चे लीगल हेड श्री.अभिनंदन यादव, ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.रामचंद्र हळदे, नाधवडे उपसरपंच मा.कु.श्रीरंग पावस्कर, प्रमोद कुडतरकर, रवींद्र खांडेकर, सुभाष शेट्ये, सुभाष खांडेकर, रोहित पावसकर, विशाल पावसकर, परशुराम इस्वलकर, प्रमोद नारकर, आण्णा शिंगरे, गणपत खांडेकर ,दीपक शेट्ये, विजय शेट्ये, सुभाष टोलवणी, संतोष शेट्ये, आयोजक श्री.दिपक पावस्कर, संतोष पावसकर, श्री.रुपेश कुडतरकर, श्री.दिपक भा.कुडतरकर, श्री.योगेश शेट्ये, श्री.प्रदिप कुडतरकर, श्री.प्रविण गुरव, श्री.श्रीकृष्णा नारकर, श्री.विजय इस्वलकर, श्री.प्रफुल घाडी, श्री.संतोष सावंत, श्री,संतोष नारकर, श्री.योगेश घाडी, श्री.चिंतामणी घाडी, श्री.प्रविण भा.कुडतरकर, श्री.संजय कुडतरकर, संतोष गुरव, मंगेश पावस्कर आदी आयोजक व्यासपिठावर उपस्थित होते.

नाधवडे प्रिमियर लीग एकता चषक ही स्पर्धा दरवर्षी मुंबई येथे भरवली जाते. यावेळी हे स्पर्धेचे पाचवे वर्ष होते. विजेत्या संघाला २५०००/- रु. व आकर्षक चषक ( श्री.मनोहर प्रभाकर नारकर पुरस्कृत कै.सौ.सुलभा प्रभाकर नारकर यांच्या स्मरनार्थ ) तर व्दितीय क्रमांकास १५०००/- व आकर्षक चषक ( श्री.दिगंबर अशोक इस्वलकर पुरस्कृत ) तर उस्कृष्ट संघ म्हणुन निरिक्षकांच्या वतीने आयोजक संघाची निवड करण्यात आली. तर त्यांना रोख रक्कम ५०००/- व आकर्षक चषक ( श्री.हर्ष योगेश शेट्ये पुरस्कृत कै.गौविंद वामन शेट्ये स्मरणार्थ ) तर उत्कृष्ट फलंदाज कु.शशांक शेट्ये, उत्कृष्ट गोलंदाज कु. प्रणव रुपे, सामनावीर म्हणुन कु.ओमकार ताम्हणकर यांना रोख बक्षिस व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. तर इमाॅजीन प्रियर आफ एकता चषक २०२३ चा मान कु.ओम हनुमंत नारकर यास देण्यात आला. सर्व चषक श्री.अमित तावडे यांच्या सौज्यन्यांने देण्यात आले. खेळामुळे गावातील तरुण, अबालरूद्ध एकञ येतात. आणि हेच एकञिकरण जोपासुन आयोजकांनी गावातील सर्वानाच एकञ करुन जे एक उत्कृष्ट नियोजन केल त्याला तोड नाही. आजच्या या स्पर्धात्मक युगात सर्वाना एकञित बांधुन ठेवून गावाच्या विकास करण्याचे हेच एक साधन आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यांजे माजी उद्योगमंञी मा.श्री.सुभाष देसाई यांनी केले.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नाधवडे गावातील ग्रामस्थांनि विशेष परिश्रम घेतले. देणगीदारांनी तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी कमिटीस सहकार्य केले त्याबद्दल आयोजकांच्या वतीने सर्वाचे आभार मानण्यात आले.