हर्चे आणि सापुचेतळे येथे करण्यात आली कारवाई दोघांवर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी) लांजा पोलिसांनी हर्चे उभावाडा आणि सापुचेतळे बाजारपेठ येथे धडक कारवाई करताना विनापरवाना देशी विदेशी तसेच गावठी हातभट्टीच्या दारू विक्री करणाऱ्यां दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे या कारवाईत ३१२० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही दोन्ही कारवाई ही बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. त्यामध्ये पहिला घटनेत सापुचेतळे बाजारपेठ येथे एक जण विनापरवाना देशी-विदेशी मद्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सापुचेतळे बाजारपेठ येथे धाड टाकळी. यावेळी बाजारपेठेतील एसटी पिकअपशेड जवळ ,किराणा माळाचे दुकानाच्या मागील बाजूस बाबू मन्या कोकरे (वय ५२, रा . चांदोर तळवाडी) हा देशी विदेशी मद्याच्या दारूसाठ्यासह आढळून आला. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९०० रुपयांचे मॅकडॉल नंबर एक लेबल असलेल्या १८० मिलि मापाच्या सहा बाटल्या ,१२६० रुपये च्या देशी दारू-संत्र लेबल असलेल्या प्लास्टिकच्या १८० म्हणजे मापाचा १८ बाटल्या, ४२० रुपये किमतीच्या देशी दारू संत्र लेबल असलेल्या ९० मिली मापाच्या १२ बाटल्या आणि दहा रुपयांची एक मळकट रंगाची कापडी पिशवी असा एकूण २५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेत बाबू कोकरे याला ताब्यात घेण्यात आले आहे .
त्याचप्रमाणे लांजा पोलिसांनी हर्चे उभावाडा येथे देखील कारवाई केली. हर्चे उभावाडा येथील जंगलमय भागात सुहास गणपत घाडी (वय ५४ राहणार हर्चे उभावाडा) हा विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या साठ्यासह आढळून आला. यावेळी पोलिसांनी ५२० रुपये किंमतीची पाच लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि दहा रुपयाचा एक प्लास्टिकचा ग्लास असा एकूण ५३० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे .
या दोन्ही घटनेत विनापरवाना दारूची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस मोरे हे करत आहेत.










