सर्पमित्रांनी पकडून सोडले वन जंगलात
दोडामार्ग: सुहास देसाई :तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असताना झोळंबे गावठणवाडीत भर वस्तीत रात्री (आर) जातीचा साप आढळून आला त्याला गावचे सर्पमित्र विठ्ठल आनंद गवस (झोळंबे) याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडून त्याला मूळ आधिवास म्हणजे वन जंगलात मध्ये नेऊन सोडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जंगली प्राण्यांचा वावर असतो मात्र अशावेळी या दक्षक्रोशी मध्ये कायम लोकांच्या हाकेला धावत जाऊन मदत करणारा युवक विठ्ठल हा कायम धाऊन जातो यामुळेच ग्रामस्थांकडून त्याचे आभार मानून साप पकडून जंगलात सोडल्याने समाधान व्यक्त केले आहे










