खेडमध्ये खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा कोलमडली

 

खेड (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात ऐन गणेशोत्सवात खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा कोलमडून गेल्याने
ग्राहकांची परवड सुरू आहे. खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा दिवसभर खंडित होत असल्याने संताप व्यक्त होत आहे सेवेतील व्यत्ययाबाबत विचारणा करायची कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित
केला जात आहे.

 

 

गेल्या काही दिवसांपासून खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा कोणत्याही क्षणी खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. गणेशोत्सवाची धामधूम सुरू असल्याने मुंबईस्थित चाकरमानी गावी आले आहेत. मात्र खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा कोलमडत असल्याने चाकरमान्यांना फटका बसत आहे. शहरासह ग्रामीण भागात कोणत्याही क्षणी मोबाईल सेवा खंडित होत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. याबाबत दाद नेमकी मागायची कोणाकडे, असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहे.