चिपळुणात कथाकथन स्पर्धेत कल्याणी साठे प्रथम

*माखजन |वार्ताहर*    चिपळूण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण आयोजित कथाकथन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील कु.कल्याणी सचिन साठे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास तिने कथेच्या माध्यमातून उलगडल, सोयामोई ते भारताचे सर्वोच्य राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या द्रौपदी मुर्मू प्रेरणादायी कथा तिने सांगितली.द्रौपदी मुर्मू यांचा लहानपणी चा खडतर प्रवास कथन करताना,सभागृहातील श्रोत्यांचे डोळे पाणावले.ही स्पर्धा शहरातील माधव सभागृहात रंगली.

कल्याणी ही माखजन इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी आहे.आजवर तिने जिल्ह्यात विविध ठिकाणी स्पर्धात सहभाग घेत ३००हुन अधिक प्रशस्तीपत्रके व पारितोषिके मिळवली आहेत.कल्याणी हिला तिचे वडील कीर्तनकार सचिन साठे यांनी मार्गदर्शन केले.

तिने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल रोख रक्कम,प्रशस्तीपत्रक,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तिच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.