कोकणचा विकास आणि समस्या दूर करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही
माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायणराव राणे यांची ग्वाही
चिपळूण (संतोष सावर्डेकर):
उद्धव ठाकरेंना बजेट कळतं का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या काळात मंत्रालयात फक्त दोनवेळा गेले. तरीही अडीच वर्षातील फुकटचे मानधन घेतले, याला काय म्हणायचे? शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतांना देशातील नेते मातोश्रीवर येत असत. मात्र, आता मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे दारोदारी फिरत आहेत, अशा शब्दांत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायणराव राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवतांना कोकणचा विकास आणि समस्या दूर करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही खा. राणे यांनी यावेळी दिली. माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा नेत्या सौ. उल्का विश्वासराव, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे व संजय राऊत हे दोघे म्हणजे महाराष्ट्र आहे का? असा सवाल उपस्थित करताना संजय राऊत मूर्ख आहे? संजय राऊतने देशाच्या, राज्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने कोणता मुद्दा मांडला किंवा अग्रलेख लिहिला ते सांगा असा सवाल उपस्थित करतांना आदित्य ठाकरेंना देखील राणे यांनी लक्ष्य केले.

ते यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ते पुढे म्हणाले की, विकास म्हटलं की आपण वाहतुकीला महत्व देतो. महामार्ग व अप्रोच रोडच्या विषयासाठी लवकरच प्रशासनासमवेत लवकरच मिटिंग घेतली जाईल, असे खासदार नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
इथला दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मिती, हा प्रश्न मार्गी लावत असतांना इथला आंबा मँगो पल्पमध्ये गेला तर आंब्याला चांगला दर मिळेल आणि आंबा बागायतदाराच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास खा. राणे यांनी दिला.
दोन्ही जिल्ह्यातील वनौषधी वनस्पतींची माहिती घेऊन जवळपास फार्मासिस्ट कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न होतील. तसेच चिपळूण शहर पुरमुक्तीसाठी प्रयत्न होणार असून यासाठी लवकरच अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन केंद्र व राज्य शासनाकडून निधी आणला जाईल, अशी ग्वाही खासदार नारायणराव राणे यांनी यावेळी दिली.
यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, सरचिटणीस सौ. श्रद्धा कदम, जिल्हा उपाध्यक्षा सौ. स्नेहा मेस्त्री, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, भाजपा चिपळूण शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, परिमल भोसले, विनोद भुरण, महेश कांबळी, भाजपा कामगार मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनोद कदम, सुनील मेस्त्री, निनाद आवटे, बापू राऊत, मेजर मनोहर शिंदे, प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, कुंदन खातू, सुरज शिंदे, सौ. प्रणाली सावर्डेकर, सौ. अमृता जोशी, अनुसूचित जाती जिल्हा मोर्चा सरचिटणीस अभिजित सावर्डेकर आदी उपस्थित होते.
चौकट
*शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले, तेव्हा महिला अत्याचार विरोधात काय केले- राणेंचा सवाल*
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना आरोपी हा आरोपी असतो. त्याला जात धर्म नसतो. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले. तेव्हा महिला अत्याचारा विरोधात काय केले? तेंव्हा ३ हजार रुपये का नाही दिले? आता या वयात काही सुचतंय ? अशा शब्दांत शरद पवार यांच्यावर टीका केली.
चौकट
*रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित व्हायला हवा*
रत्नागिरी जिल्हा पर्यटन घोषित व्हायला हवा. नंतरच विमानतळ, परशुराम ते गोविंदगड किल्ला रोप-वे यासारखे पर्यटनात्मक प्रश्न मार्गी लागतील. रोजगार निर्मितीसाठी इंडस्ट्रीज महत्त्वाची आहे. मात्र, सध्या विरोध होतो आहे, तो नको, असे ग्लोबल टुरिझमच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना सांगितले. चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी आराखडा तयार करून तो मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर चर्चासत्र घेऊ. जेणेकरून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची दिशा मिळेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ग्लोबल टुरिझमचे राम रेडीज, संजीव अणेराव, शहनवाज शाह, अशोक भुस्कुटे आदी उपस्थित होते.
चौकट
यावेळी चिपळूणमध्ये नव्याने अनावरण झालेल्या शिवपुतळ्याचे राणे यांनी दर्शन घेतांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी चिपळूण नगर परिषदेतर्फे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे आदींनी खा. राणेंचे स्वागत करीत सत्कार केला. तसेच चिपळूण मधील सार्वजनिक गणेश बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खा. राणेंचे व सौ. निलमताई राणे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.












