आचरा येथे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे मोठ्या भक्ती भावात विसर्जन

आचरा | अर्जुन बापर्डेकर
आचरा येथील गणपती बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या गजरात साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले.आरती,भजन,फुगडी च्या गजरात गेले दहा दिवस रंगून गणेशाच्या आराधनेत भाविक तल्लीन होऊन गेले होते. गणेशत्सवात पावसाची हजेरी अधूनमधून असतानाही गणेशोत्सवाचा उत्साह वाढला होता. अनंत चतुर्दशी दिवशी आचरा येथील पारवाडी खाडीत,पिरावाडी समुद्र किनारी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी उशिरा पर्यंत पारवाडी खाडी,पिरावाडी समुद्र किनारी ,भगवंतगड कालावल खाडी तसेच इतर भागात लगतच्या पाणवठ्याच्या ठिकाणी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.