ओझर विद्या मंदिर चे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Ozar Vidya Mandir Success in National Scholarship Exam

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव, तालुका मालवण ह्या माध्यमिक शाळेमधून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन एन एम् एस) परीक्षेत भूमिका सदानंद कोचरेकर आणि श्री राज केशर जुवाटकर या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. त्याचप्रमाणे नितीन जयेंद्र परब आणि संचिता संदेश परब हे दोन विद्यार्थी चांगल्या गुणांनी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल पंचक्रोशीतून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

तसेच शाळेची शिक्षण संस्था, शालेय समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक समिती, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी-पालक यांच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती शालेय समितीचे अध्यक्ष श्री किशोर नारायण नरे आणि प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी आर खोत यांनी दिली. शिष्यवृत्ती प्राप्त व यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील साहाय्यक शिक्षक श्री डी डी जाधव, श्री अभय शेर्लेकर, श्री एन एस परुळेकर, श्री पांडुरंग राणे, श्री शिवराम सावंत व श्री प्रवीण पारकर यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या व मुलांच्या या यशाबद्दल संस्थेचे चिटणीस जी एस परब यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. या परीक्षेत इयत्ता आठवीतील एकूण सहा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी चार विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यामधील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.