स्वप्न आणि सत्याचं गुढ…!

सावंतवाडी रेडी येथील योगेश आर्या या तरूणाच्या स्वप्नात जंगल परिसरात एक मृतदेह झाडाला लटकलेला आहे. हा मृतदेह आपणाला सोडवण्यासाठी दररोज स्वप्नात येऊन सांगतोय असं स्वप्न जवळपास पंधरा दिवस आपणाला पडत असल्याचे योगेशने खेड पोलिसांना सांगितले आणि त्यानंतर खेड पोलिसांनी तपास सुरू केला.

त्यानंतर खेड पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर खेड तालुक्यातील भोस्ते घाटातील जंगलामध्ये एक मृतदेह सापडला. हा मृतदेह सापडल्यानंतर पोलिस तपासांची चक्रे सुरू झाली. परंतु ज्या योगेश आर्या या तरूणाने खेड पोलिसांना त्याच स्वप्न सांगितल. त्याच ते कथीत स्वप्न सत्य ठरल. मृतदेह सापडला आणि पोलिसांनी योगेशला जाऊ दिलं. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेतलेल आहे. सोबत आणखी दोन तरूणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. योगेश आर्याच्या सांगण्यानुसार मृतदेह सापडला असला तो सांगत असलेल स्वप्न जरी सत्य म्हटल तरीही त्यातून अनेक प्रश्नांची मालिका निर्माण झाली आहे. तो मृतदेह कोणाचा आहे त्याला कोणी मारल ? मारेकरी कोण आहेत ? योगेश आर्याला स्वप्नात हा परिसर कसा आला ? तो खेडला कसा पोहचला.

असे अनेक प्रश्न निर्माण होणारे आहेत. खेड पोलिसांसमोर हे फारमोठे आव्हानच आहे. मृतदेहाची तपासणीनंतरच काही गोष्टी स्पष्ट होतील. मात्र, कोणत्याही मर्डरकेसमध्ये साक्षी, पुरावे आवश्यक ठरतात. प्रत्यक्षदर्शी किंवा ज्यांच्याकडून त्यासंबंधीची खात्रीशीर माहिती मिळणे आवश्यक असते तर्कसंगती न्यायालयात उपयोगाची ठरत नाही. त्यासाठी ठोस पुरावेच लागतात. या संपूर्ण प्रकरणात योगेश आर्या याच्याकडून मिळणारी माहिती त्याचे व्हीडिओ योगेशशी संबंधित मित्रपरिवार, योगेश रत्नागिरीला कामाला होता.

अशा अनेक मार्गाने पोलिसांना माहिती मिळवावी लागणार आहे. रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळाची पहाणी केली आहे. या प्रकरणाच्या तपासकामात खेड पोलिस तपास करीत असले तरीही रत्नागिरी स्थानिय गुन्हा अन्वेषन विभागाचे पथक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्ररित्या तपासकाम करीत आहे. खरंतर कुणाच्यातरी स्वप्नात मृतदेह तो परिसर येतो आणि आपला शोध घ्यायला सांगतो असं एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारख असणार हे सर्व प्रकरण वाटते. स्वप्नात येऊन एखाद्या मर्डरची माहिती होणारी घटना पोलिसांनी अभावानेच असेल. योगेश आर्याच्या या स्वप्नाने गुढ वाढवलय हे गुढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

खेड भोस्ते घाटातील या गुढ मर्डर केसच्या निमित्ताने ३५ वर्षापूर्वी खेड भरणा नाका येथे झालेल्या एका मर्डर केसची आठवण झाली. गोवा लक्झरी बसने मुंबईचा प्रवास करणारी चंद्रकला लोटलीकर या महिलेचा भरणानाका येथे लक्झरीबस जेवणासाठी थांबलेली असताना ज्या हॉटेलमध्ये प्रवाशांसह चंद्रकला लोटलीकर जेवायला बसली होती त्याच हॉटेलमधील मागच्या बाजूला टॉयलेटसाठी ती महिला गेली असता हॉटेलमधील नोकर आणि मालक यांनी त्या महिलेचा बलात्कार करून खून केलेला. त्या प्रकरणाचा शोध लागणेही शक्य नव्हते. परंतु पोलिसांनी वेषांतर करून तब्बल सहा महिने त्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करून त्या चंद्रकला लोटलीकर यांच्या खून्यांवर दोषारोपपत्र ठेवले गेले. खून्यांपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी घेतलेली मेहनत, कष्ट प्रचंड होते. त्या पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला सॅल्यूट. अलिकडच्याकाळात पोलिसांनी वेषांतर करून एखाद्या गुन्हा उघडकीस आणल्याचे उदाहरण देता येणार नाही. त्यात फक्त पोलिसांनाच दोष देऊन चालणार नाही तर समाज, राजकारणी आणि सर्वच जबाबदार घटकही त्याला कारणीभूत आहेत. खेड भोस्ते घाटातील ही मर्डरकेस रत्नागिरी पोलिस कशारितीने ओपन करतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरणारे आहे.