“उभादांडा हायस्कूलचे गणित संबोध परीक्षेत सुयश”

 

वेंगुर्ला l प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा विदयालयातील विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर परीक्षेत विदयालयातून 38 पैकी 38 विदयार्थी उत्तीर्ण होवून विदयालयाचा निकाल 100 % लागलेला आहे. सदर परिक्षेत 1 ते 5 गुणानुक्रम आलेले विदयार्थी पुढीलप्रमाणे आहेत.

1) मयंक मोहन नंदगडकर 2) प्राजक्ता अनिल भोकरे

3) प्रतिक प्रदिप नाईक 4) ईशा सुधर्म गिरप

5) यश अरूण चेंदवणकर विभागून

प्रज्ञा शिवानंद आरावंदेकर

सदर विदयार्थी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण होवून त्याची गणित प्राविण्य परीक्षेसाठी निवड झालेली आहे. सदर विदयार्थ्यांना विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. उमेश वाळवेकर व श्री. सुकी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सदर विदयार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे संस्था चेअरमन श्री. विरेंद्र कामत आडारकर, संस्था सचिव श्री. रमेश नरसुले, व्हाईस चेअरमन श्री. रमेश पिंगुळकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.