महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्राच्या वतीने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी दि.२६ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिर

मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजन

मोडकाआगर | वार्ताहर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्राच्या वतीने व अपरांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकार्याने मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर गुरुवार दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा मुंढर शिरबारवाडी येथे आयोजित करण्यात आला या आरोग्य शिबिरामध्ये नाक, कान, घसा, डोळे, रक्तगट यांची मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषध, मोफत चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आला आहे. तरी या शिबिराचा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी केले असून मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उप तालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.