मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्याकडून उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत
मोडकाआगर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावचा सुपुत्र कु. चंद्रकांत राजाराम कांबरे हे ब्लड कॅन्सर Leukemia या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी त्याच्या उपचारासाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत दिली आहे.खारघर मुंबई येथील टी.डब्ल्यू. जे. रेसिडेन्सी येथे भेट देऊन त्याला वैद्यकीय मदत म्हणून एक लाख रुपयाचा धनादेश दिला तसेच वैभव गांधी मुंढर, (सध्या वास्तव मुंबई) यांनी दहा हजार रुपये रोख स्वरूपात मदत गुहागर तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तीनी आर्थिक मदत दिली आहे.कु.चंद्रकांत राजाराम कांबरे हा अष्टपैलू खेळाडू असून आजवर क्रीडा क्षेत्रात त्याने कबड्डी व क्रिकेट क्षेत्रात आपले नाव जिल्हास्तरापर्यंत गाजवले आहे. त्याच्या या खेळाला दाद देणारे गावात त्याच बरोबर गावाच्या बाहेर असंख्य चाहते आहेत. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.त्याच्या उपचारांसाठी ढोबळ खर्च पाहता सहा महिन्याच्या किमो थेरपी साठी किमान सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ( त्यापेक्षा ही अधिक ) त्याच बरोबर गोळ्या औषधांचा मासिक खर्च ५५ ते ६० हजार रुपये इतका आहे.
कु. चंद्रकांत हा केवळ ३० वर्षांचा असून एवढ्या मोठ्या आजाराला तो झुंझ देत आहे. आयुष्याकडे सकारात्मक विचाराने बघायच्या वेळेसच त्याला एवढ्या मोठ्या आजाराने ग्रासले आहे. त्याला अनेक दानशूरानी मदतीचा हात पुढे केला आहे.
चौकट
गुहागर तालुक्यातील सर्व क्रिकेट व कबड्डी खेळाडूंच्या मदतीच्या आवाहनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी तातडीने प्रतिसाद देत कुठल्याही वैद्यकीय मदतीचा फक्त देखावा न करता प्रत्यक्षात वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या चंद्रकांत कांबरे हा रहात असलेल्या खारघर येथे ठिकाणी जाऊन भेट घेतली आणि त्याची विचारपूस करून त्याला धीर देऊन परत लढण्याची जिद्द देऊन त्याला एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्त केला. प्रमोद गाधी यांनी केलेल्या या निस्वार्थी मदतीमुळे गुहागर टेनीस क्रीकेट मध्ये त्यांची खुप चर्चा होत आहे आणि गुहागर तालुक्यातील , रत्नागीरी जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांकडून, सर्व संघांकडून , प्रत्येक गावातून , वाडीतुन त्यांचे आभार व्यक्त होत आहेत.











