चिपळूण मधील दहा गाव कुणबी विकास संघटनेची वार्षिक सभा उत्साहात

चिपळूण (वार्ताहर) : दहा गाव कुणबी विकास मंडळ यांची वार्षिक सभा केतकी भुवडवाडी येथे 28 रोजी रविवार रोजी यशवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.तालुक्यातील बिवळी, भिले, केतकी, करंबवने, पोसरे, दोनवली मालदोली, गांग्रई, कापरे भोम या गावातील कुणबी बांधवांची ही दहा गाव संघटना आहे. गेली अनेक वर्षे समाजाच्या विकासासाठी संघटना काम करीत आहे.

सदर सभेसाठी दहा गावातील कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत
नवीन कार्यालयीन इमारत बांधणे,जातनिहाय जनगणना, कुणबी आरक्षण तसेच समाजपयोगी कार्यक्रम या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या सभेला उपाध्यक्ष सुरेश गोलमाडे, हरिश्चंद्र खळे, सचिव डॉ् मंदार चांदिवडे, सहसचिव कृष्णा शिगवण, खजिनदार विजय बांद्रे व सर्व सदस्य व समाजबांधव उपस्थित होते, माजी सभापती पांडुरंग माळी यांनी सभेला मार्गदर्शन केले. या सभेची सांगता सायंकाळी 6 वाजता करण्यात आली.