भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी ही जिल्ह्यातील शैक्षणिक अग्रगण्य संस्था आहे.संस्थेचे संस्थापक गुरूवर्य कै.अच्युतराव पटवर्धन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी कै.अच्युतराव पटवर्धन “वक्ता दशसहस्त्रेषु”या स्पर्धेचे आयोजन केले जाते.त्यानुसार भारत शिक्षण मंडळ संचलित, पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला, कै.सौ.विजयालक्ष्मी(गोदूताई)श्रीकृष्ण(नाना) गांधी वाणिज्य व श्रीमान रमेशजी कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय , देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी ,आयोजित कै. अच्युतराव पटवर्धन स्मृती “वक्ता दशसहस्त्रेषु” जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा -2024 चे आयोजन दिनांक -13, ऑक्टोबर, 2024 वार- रविवार रोजी पटवर्धन हायस्कूल या ठिकाणी सकाळी ठीक १०.०० वाजता करण्यात आलेले आहे .सदर स्पर्धेसाठी तीन गट ठेवण्यात आले आहेत .गट क्रमांक १) सहावी ते आठवी- विषय- १) जलसंवर्धन आपली जबाबदारी २)होय ,मी ग्रंथालय बोलतेय! गट क्रमांक २) नववी ते बारावी -विषय- १)शब्द माझे माझिया हातातील तलवार २) खुला मोबाईल, बंद पुस्तके. गट क्रमांक ३) -शिक्षक गट -विषय- १)जागतिक वातावरणातील बदल चिंता व चिंतन ,२) भय इथले संपत नाही. प्रवेश नोंदविण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर 2024 अशी आहे.
प्रवेश सर्व शाळांमधील मुख्याध्यापक वा शिक्षकांकडून नोंदवण्यात यावेत.स्पर्धेसाठी गट १व२साठी प्रत्येकी अनुक्रमे १००१,७५०,५०० व उत्तेजनार्थ दोन व गट तीनसाठी अनुक्रमे २०००,१५००,१००० व दोन उत्तेजनार्थ पारितोषिक रोख स्वरूपात, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येईल. स्पर्धेचे सर्व अधिकार भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी या व्यवस्थापन विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.स्पर्धेमध्ये अधिकाधिक स्पर्धकांनी भाग घ्यावा यासाठी भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी व पटवर्धन हायस्कूलच्या प्रशासकीय विभागप्रमुख मुख्याध्यापिका श्रीम.जानकी घाटविलकर ,प्रशासन विभाग व स्पर्धा समिती प्रमुख श्रीम.मानसी चव्हाण (मो.नं ९२८४४६३७१४)व सर्व स्पर्धा सदस्य यांच्यामार्फत आवाहन करण्यात येत आहे.स्पर्धेसंदर्भातीलअधिक माहितीकरिता गट -१ )सहावी ते आठवीसाठी श्री.कौस्तुभ पालकर सर (९०२८८३८०००) व श्रीम.श्रध्दा हर्डीकर मॅडम (७५८८४८८९३५) गट२)नववी ते बारावीसाठी श्रीम. प्रिती केळकर मॅडम (९४२०१५६४७७)व श्रीम.श्रीम.मिना टापरे (ताडे )मॅडम (९३७०२४९२८६)व शिक्षक गटासाठी श्री. कैलास वाडकर सर (९४२३८०४६७६)व श्री. दिनेश मोहिते सर(९५२७७९४२५२) यांच्याशी संपर्क साधावा.











