कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबार्डे येथील डंपर चोरी प्रकरणी आरोपींना प्रशांत जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रल्हाद प्रदिप परब, नरेंद्र प्रभाकर बाणे व विश्वनाथ राघो धुमक यांच्या विरुद्ध वेंगुर्ला पोलीस स्टेशन येथे डंपर नं.MH०७८६१३९ अशा नंबरचा डंपर जो शिरोडा-रेडी बायपास रोडवर उभा करून ठेवलेला होता तो चोरून नेऊन कोल्हापूर येथे विकल्याबाबत डंपर मालकाने तक्रार दिली होती.
त्यानुसार वेंगुर्ला पोलिस ठाणे गुन्हा रजि नं. २९/२०२४ ने सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून भा.द.वि. कलम ३७९ व ३४ या कलमांखाली सदर आरोपींना वेंगुर्ला पोलीसांनी अटक केली व वेंगुर्ले येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर दि. १८/०९/२०२४ हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली होती व त्यानंतर दि. २१/०९/२०२४ रोजी हजर केले असता पोलिसांची दोन दिवस पोलिस कस्टडी मिळण्याची मागणी मे कोर्टाने फेटाळून त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीत घेऊन सदर आरोपींना वेंगुर्ला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार डी. व्हाय रायरीकर यांनी सशर्त जामिन मंजूर केला मे कोर्टाने दोषारोप पत्र सादर होई पर्यंत प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी वेंगुर्ला पोलिस स्टेशन येथे हजर राहून तपासात सहकार्य करावे. त्या अटीवर प्रत्येकी १५,०००/- जामीन मंजूर केला आरोपी तर्फे वकील ॲड. गौरव पडते, ॲड. द्रौपदी धुरी, ॲड. अभिजित परब, ॲड. अपर्णा सामंत, ॲड. स्वप्नाली गावडे यांनी काम पाहिले










