रत्नागिरी : प्रतिनिधी
मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नाणीज येथे गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी आणि डंपर अपघात मृत्युमुखी पडलेल्या अरुण दरडी आणि रामचंद्र दरडी यांच्या कुटुंबियांची भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आज भेट घेतली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी दरडी कुटुंबाचे सदस्य आणि भाजपा कार्यकर्ता वसंत दरडी यांच्यासमवेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर व अन्य भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.












