आरक्षण हा वंचितांचा हक्क – किशोर कांबळे 

 

 

या जन्मात कोणीही आरक्षण संपवू शकत नाही

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध 

महायुतीच्या आरक्षण बचाव रॅलीत दलित बांधवांनी सहभागी व्हावे : कांबळे यांचे आवाहन 

वैभववाडी l प्रतिनिधी :    ‘आरक्षण संपविणार’ या राहुल गांधींच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आरक्षण हा वंचितांचा हक्क आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे या जन्मातही आरक्षण संपवू शकत नाही. यापुढे त्यांनी अशी वक्तव्य करण्याचे धाडसही करू नये. अशी टीका हेत माजी सरपंच किशोर कांबळे यांनी केली. ५ ऑक्टोबर रोजी कणकवली देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या आरक्षण बचाव रॅलीत सर्व दलित बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहनही किशोर कांबळे यांनी केले.

राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाने नेहमीच आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे. परंतु आम्ही देशातील आरक्षण घालवू देणार नाही. लोकसभा निवडणुकीत संविधान बचाव म्हणून राहुल गांधी सर्वत्र बोंबलत होते. तर काही महिन्यातच त्यांनी आरक्षण संपविणार असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांची दुटप्पी भूमिका जनतेसमोर आली आहे. अशी टीका किशोर कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.