न्हावेली शाळा नं. ४ येथील तीव्र वळणावर बहिवर्क आरसा 

 

गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि युवा कार्यकर्त्यांचा उपक्रम

न्हावेली – श्रेयस गावडे :   न्हावेली देऊळवाडी मार्गावरील शाळा नं. ४ येथील तीव्र वळणावर बहिवर्क आरसाचा बसवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. या मार्गावरील तीव्र वळणावर शाळा असून या मार्गावरुन शाळेतील मुलांची ये जा मोठया प्रमाणावर असते तसेच गावातील हा मुख्य रस्ता असून वाहनाची रहदारी मोठया प्रमाणावर असते.

या वळणावरील समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर व गावातील युवा कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने या तीव्र वळणावर बहिरवर्क आरसा बसवून त्याचा शुभारंभ केला . यावेळी उपसरपंच अक्षय पार्सेकर , नितीन चव्हाण ,प्रथमेश नाईक ,राज धवन ,धनेश नाईक भूषण पार्सेकर, सुदन पार्सेकर ,दीपक बरकुटे ,अजय पार्सेकर वासुदेव पार्सेकर ,चेतन पार्सेकर, सुजित नेमण ,प्रितेश परब ,ओम पार्सेकर ,अमोल पार्सेकर, तुकाराम पार्सेकर ,ॲंडी नाईक सावळाराम न्हावेलकर ,दिपक पार्सेकर , ओम पार्सेकर, समिर पार्सेकर ,सिद्धेश पार्सेकर ,तुळशीदास पार्सेकर, सगुण नाईक रूपेश नाईक, प्रथमेश नाईक ,विकास मांजरेकर ,सिद्देश धवण किशोर नाईक ,श्याम नाईक आदी उपस्थित होते