वेंगुर्ला – महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, कुडाळ आयोजित कै. सौ. गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती हिंदी भाषा वक्तृत्व जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी कु.महिमा रूपेश नार्वेकर हिने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला.
कु. महिमा नार्वेकर हिने २१ संदी का भारत या विषयावर भाष्य केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांनीला प्रशालेचे लिपिक अजित केरकर आणि प्रा. वैभव खानोलकर या सह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.
उभादांडा हायस्कूलच्या या विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रूपये , सन्मानपत्र, देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष निवृत्त गट शिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, निलेश मांजरेकर , राधाकृष्ण मांजरेकर, सुनिल परब आणि सर्व पदाधिकारी यांनी महिमा नार्वेकर व , मार्गदर्शक शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी या बरोबरच या विद्यार्थ्यांनीचे पालकाचे ही विशेष अभिनंदन केले असुन जिल्हास्तरांवर वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या प्रशालेचे आणि विद्यार्थ्यांनीचे ही विशेष कौतुक केले जात आहे.











